sushant singh rajputs vescera report

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिल्याला चार महिने उलटून गेल्याची आठवण या याचिकेद्वारे करण्यात आलीय. न्या. हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने बिहार सरकारच्या विनंतीवरून सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता.

सुशांत सिंग संशयास्पद मृत्यूप्रकरणी सीबीआय करत असलेल्या तपासाचं काय झालं, याबाबत सीबीआयनं माहिती द्यावी, अशी मागणी कऱणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दोन महिन्यांत याबाबतची चौकशी पूर्ण करून अहवाल देण्याची सूचना न्यायालयानं सीबीआयला करावी, अशी मागणीदेखील या याचिकेत करण्यात आलीय.

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिल्याला चार महिने उलटून गेल्याची आठवण या याचिकेद्वारे करण्यात आलीय. न्या. हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने बिहार सरकारच्या विनंतीवरून सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता.

या चौकशीच्या कालावधीला काही कालमर्यादा असायला हव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलीय. सीबीआयने दोन महिन्यांत चौकशी संपवून त्याला अहवाल सर्वोच्च न्यायालय तसेच संबंधित यंत्रणांना द्यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलीय.

सीबीआय या प्रकरणाचा गांभिर्यानं तपास करत नसल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आलाय. यामुळे तपास यंत्रणांवरील नागरिकांचा विश्वास उडत असून देशाची बदनामी होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आलाय.