मोदींसारखं वागू नका, मास्क वापरा! मोदींनी मास्क न घातल्याचा व्हिडिओ ‘आप’कडून व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वारंवार आपल्या भाषणातून मास्क घालण्याचा संदेश देत असतात. मन की बात असो किंवा सार्वजनिक कार्यक्रमातील भाषणं असोत, पंतप्रधान मोदी मास्क लावण्याचं महत्त्व सांगत असतात. मात्र एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी स्वतःच मास्क न लावता फिरत असल्याचं दिसून आलंय. त्यांना मास्क दिला असता तो नाकारून ते पुढं गेल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

देशातील कोरोनाचं संकट अद्यापही संपलेलं नाही. सार्वजनिक ठिकणी जाताना मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचं असल्याचा वारंवार सांगितलं जातं. सर्व सरकारी यंत्रणांमधून याचा प्रचारही केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वारंवार आपल्या भाषणातून मास्क घालण्याचा संदेश देत असतात. मन की बात असो किंवा सार्वजनिक कार्यक्रमातील भाषणं असोत, पंतप्रधान मोदी मास्क लावण्याचं महत्त्व सांगत असतात. मात्र एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी स्वतःच मास्क न लावता फिरत असल्याचं दिसून आलंय. त्यांना मास्क दिला असता तो नाकारून ते पुढं गेल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

आम आदमी पक्षानं हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर सध्या अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या व्हिडिओत एक व्यक्ती पंतप्रधान मोदींशी गुजराती भाषेत बोलत असल्याच दिसतं. ती व्यक्ती त्यांना मास्क घेण्याचा आग्रह करतेय. मात्र वारंवार विनंती करूनही मोदी मास्क घेत नसल्याचं या व्हिडिओत दिसतंय.

मोदींसारखं वागू नका, मास्क वापरा, अशी उपरोधिक टीका आम आदमी पक्षानं करत हा व्हिडिओ शेअर केलाय.