भाजप इलेक्शन मोडमध्ये, पंतप्रधानांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक, ठरला शेतकरी आंदोलनाबाबतचा अजेंडा

या वर्षात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत भाजपची रणनिती काय असावी, हे ठरवण्यासाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली. या बैठकीला पंतप्रधान मोदींसोबत पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

    भारतातील पाच राज्यांमध्ये या वर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असूून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची रणनिती आखायला सुरूवात केली.

    या वर्षात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत भाजपची रणनिती काय असावी, हे ठरवण्यासाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली. या बैठकीला पंतप्रधान मोदींसोबत पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

    यंदाच्या निवडणुकांमध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मुद्दा कळीचा असणार आहे. याबाबत प्रचाराची रणनिती काय असावी, याविषयी या बैठकीत खल झाल्याची माहिती मिळेतय. शेतकऱ्यांमध्ये या कायद्यांविषयी जनजागृती करणे आणि या कायद्यांचे फायदे शेतकऱ्यांना समजून देणे या दृष्टीनं प्रयत्न करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आल्याचं कळतंय.

    निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये सध्या वातावरण तापायला सुरुवात झालीय. पक्षांतरांना सध्या जोर आला असून राज्यातील प्रभावी नेते आणि व्यक्तींना आपल्या पक्षात खेचण्यासाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.