फ्रंटलाईन वर्कर्ससाठी क्रॅश कोर्स, पंतप्रधान मोदींच्या हस्ते थोड्याच वेळात उद्घाटन, मोदी देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात फ्रंटलाईन वर्कर्ससाठीच्या क्रॅश कोर्सचं उद्घाटन करतील. त्यानंतर ते देशाला संदेशपर भाषणही करणार आहेत. देशातील २६ राज्यांमध्ये एकूण १११ प्रशिक्षण केंद्रं यासाठी उभारण्यात आलीयत. कौशल्य विकास मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाने या उद्घाटन सोहळ्याचा समारोप होणार आहे. 

    भारतातील कोरोनाची दुसरी लाट उतरणीला लागत असताना आणि लसीकरणाची गती पुढील काही महिन्यांमध्ये वाढण्याची शक्यता दिसू लागली असताना आता फ्रंटलाईन वर्कर्ससाठी एका क्रॅश कोर्सचं आयोजन केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते थोड्याच वेळात होणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात फ्रंटलाईन वर्कर्ससाठीच्या क्रॅश कोर्सचं उद्घाटन करतील. त्यानंतर ते देशाला संदेशपर भाषणही करणार आहेत. देशातील २६ राज्यांमध्ये एकूण १११ प्रशिक्षण केंद्रं यासाठी उभारण्यात आलीयत. कौशल्य विकास मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाने या उद्घाटन सोहळ्याचा समारोप होणार आहे.

    देशातील कोरोना लसीकरणाचं बदललेलं धोरण, लसींची उपलब्धता आणि कोव्हिशिल्डच्या दोन लसींमधील अंतराबाबत सध्या सुरु असलेली चर्चा याबाबत पंतप्रधान काही भाष्य करतात का, याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना भारतातील लसींच्या उपलब्धतेबाबतही पंतप्रधान काय सांगतात, याकडं देशाचं लक्ष असणार आहे.