Need a Central Vista project? nrsj

संसदेच्या प्रस्तावित चार मजली इमारतीचं भूमीपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध मान्यवर आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत करणार आहेत. ६४ हजार ५०० चौरस मीटरच्या क्षेत्रात ही नवी संसद भवनाची इमारत उभी राहणार आहे. या इमारतीसाठी साधारण ९७१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. २०२२ पर्यंत याचे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं भूमीपूजन आणि पायाभरणी समारंभ पार पडणार आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि वेगवेगळ्या देशांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

संसदेच्या प्रस्तावित चार मजली इमारतीचं भूमीपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध मान्यवर आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत करणार आहेत. ६४ हजार ५०० चौरस मीटरच्या क्षेत्रात ही नवी संसद भवनाची इमारत उभी राहणार आहे. या इमारतीसाठी साधारण ९७१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. २०२२ पर्यंत याचे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

नवीन संसदेच्या बांधकामाचा प्रस्ताव ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी ठेवण्यात आला होता. राज्यसभेत हा प्रस्ताव सभापती व्यंकय्या नायडूंनी तर लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठेवला होता. अहमदाबादच्या मेसर्स एचपी डिझाईन अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी नव्या संसद भवनाचं डिझाईन तयार केलंय. तर टाटा प्रोजेक्ट लिमिटेडद्वारे याचं बांधकाम केलं जाणार आहे.

सर्व आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज अशी ही इमारत असणार आहे. याच्या बांधकामादरम्यान संसदेच्या कामकाजात कमीत कमी अडथळे येतील आणि पर्यावऱणाला हानी पोचणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. नव्या संसद भवनाच्या लोकसभा कक्षात ८८८ जणांच्या बसण्याची सोय असेल. संयुक्त अधिवेशनात १२२४ खासदारांच्या एकत्र आसनव्यवस्थेची सोय असणार आहे. तर राज्यसभेत ३८४ जणांच्या बसण्याची सोय करण्यात येणार आहे.