पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठकीत अचानक एन्ट्री, विद्यार्थ्यांना सरप्राईज, दिला हा सल्ला

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे शिक्षण मंत्रालयाने सीबीएससी बारावी बोर्डाचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत व्हर्चुअल बैठक आयोजित केली होती. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे त्यांच्यासोबत चर्चा करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक या बैठकीत एन्ट्री घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पालकांसोबत संवाद साधला.

  नवी दिल्ली:- कोरोनाने संपूर्ण जग जणू काही वेठीला धरले गेले आहे. कोरोना विषाणूचा फटका हा सगळ्याच क्षेत्राला बसला आहे. कोरोनाने जशी अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे, तसेच त्याचा फटका हा शिक्षण व्यवस्थेलासुध्दा बसला आहे. शिक्षण व्यवस्थेची घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी शिक्षण मंत्रालय प्रयत्न करत आहे.

  कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे शिक्षण मंत्रालयाने सीबीएससी बारावी बोर्डाचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत व्हर्चुअल बैठक आयोजित केली होती. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे त्यांच्यासोबत चर्चा करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक या बैठकीत एन्ट्री घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पालकांसोबत संवाद साधला.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उच्चस्तरीय बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर देशातील कानाकोपऱ्यातून काही संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक बारावीचा निकाल आणि विद्यापीठातील प्रवेशाबाबत काळजीत होते. या स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत येऊन पालक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

  व्हर्चुअल बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ” बारावीचे विद्यार्थी कायम आपल्या भविष्याचा विचार करतात. १ जूनपर्यंत तुम्ही सगळे परीक्षेच्या तयारीत असाल.” यावर एका विद्यार्थिनीने उत्तर दिले की, ” सर, परीक्षा उत्सवाप्रमाणे साजरी करावी असं तुम्हीच म्हटलं होत. त्यामुळे आमच्या मनात परीक्षेची कोणतीही भीती नाही.”

  या बैठकीदरम्यान हिमाचल प्रदेशातील एका विद्यार्थिनीने बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तर मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त निबंध लिहिण्यास आणि त्यावर अभ्यास करण्यास सांगितले.