भंडारा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून मदत जाहीर, मिळणार आर्थिक आधार

भंडारा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

भंडाऱ्यातील हॉस्पिटलला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान साहाय्यता निधीतून मदत घोषित करण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

भंडाऱ्यात महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घडली होती. भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या शिशु केअर युनिटला मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये दहा नवजात बालकांना आपला प्राण गमवावा लागला. मध्यरात्री दोन वाजता भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ही दुर्घटना घडली. नवजात शिशु केअर युनिट मध्ये अचानक आग लागली आणि बघता बघता या आगीने पेट घेतला.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे कारण आत्तापर्यंत समोर येत आहे. युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. नर्सनं दार उघडून बघितलं त्यावेळी सगळीकडे प्रचंड धूर झाला होता अधिकाऱ्यांना तातडीने याची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर हालचाली सुरू झाल्या.

अग्निशमन दलानं तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य देखील सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या बालकांना वाचवण्यात यश आलं होतं, तर आउटगोइंग युनिटमधील १०  नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभर हळहळ पसरलीय.