पंतप्रधान मोदींची दिल्लीतील गुरुद्वाराला सरप्राईज व्हिजिट, गुरु तेज बहादूर सिंग यांचे गायले गोडवे

दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मुख्यत्वे पंजाबातील शेतकरी आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी दिलेल्या गुरुद्वारा भेटीकडं पाहिलं जातंय. या भेटीवेळी कुठलाही पोलीस बंदोबस्त नव्हता. वाहतुकीतही कुठले बदल करण्यात आले नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी दिल्लीतील रकबंगज गुरुद्वाराला सरप्राईट भेट देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गुरु तेज बहादूर सिंग यांच्या चरणी आपण नतमस्तक होत असून त्यांचे कार्य महान असल्याचे गोडवे यावेळी पंतप्रधानांनी गायले.

दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मुख्यत्वे पंजाबातील शेतकरी आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी दिलेल्या गुरुद्वारा भेटीकडं पाहिलं जातंय. या भेटीवेळी कुठलाही पोलीस बंदोबस्त नव्हता. वाहतुकीतही कुठले बदल करण्यात आले नव्हते.

इतर यंत्रणांना कल्पना न देता पंतप्रधान मोदींनी गुरुद्वाराला अचानक भेट दिली. “आज सकाळी मी रकब गंज साहिब गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं. गुरु तेज बहादूर सिंग यांचे आशिर्वाद घेतले. गुरु तेजबहादुरजींच्या कार्यकर्तृत्वाने जगातील लाखोजणांप्रमाणे मीदेखील भारावून गेलो आहे”, असं मोदींनी ट्विट केलंय.

शनिवारी गुरु तेज बहादूर यांची पुण्यतिथी होती. शिख समुदायाचे नववे गुरू तेज बहादूर सिंग यांच्यावर याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सर्वसमावेशक समाजाची त्यांची शिकवण कायमच सर्वांच्या स्मरणात राहिल, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.