पंतप्रधान करणार कोरोनाविरोधी लसीकरणाची सुरुवात; आरोग्य मंत्रालयाची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आजपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. या मोहिमेची सुरुवात करताना पहिल्या दिवशी लस टोचून घेणार्‍या देशभरातल्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांसोबत पंतप्रधान संवाद साधण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दिल्ली (Delhi).  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आजपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. या मोहिमेची सुरुवात करताना पहिल्या दिवशी लस टोचून घेणार्‍या देशभरातल्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांसोबत पंतप्रधान संवाद साधण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

याचवेळी मोदी यांच्या हस्ते को-विन (कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क) या अ‍ॅपचे देखील लोकार्पण करण्याची शक्यता आहे. कोरोनाविरोधी लसीच्या वितरणावर या डिजिटल मंचाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी देशभरातील 2934 केंद्रांवर जवळपास 3 लाख आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण केले जाणार आहे. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍यानुे दिली. प्रत्येक सत्रात कमाल 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य कर्मचार्‍यांच्या दिलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या 1.65 लाख मात्रा सुरुवातीला घेतल्या आहेत. दररोज 10 टक्के कमी खराब होतील आणि प्रत्येक सत्रात 100 जणांचे लसीकरण करण्यात यावे, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे.