देशात कोरोनाचे पुन्हा थैमान, पंतप्रधान आज घेणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

प्रत्येक राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि राज्यांना सूचना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता या बैठकीला सुुरुवात होईल. या बैठकीत कोरोनाबाबतचे उपाय आणि कोरोना लसीकरणासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. 

    देशात कोरोनाचा प्रकोप वाढत चाललाय. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक प्रशासनाने त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून उपाययोजना केल्या आहेत. आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत.

    प्रत्येक राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि राज्यांना सूचना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता या बैठकीला सुुरुवात होईल. या बैठकीत कोरोनाबाबतचे उपाय आणि कोरोना लसीकरणासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

    यापूर्वीदेखील पंतप्रधान मोदींनी अनेकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून वेळोवेळी कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होणार असून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या सूचना आणि प्रस्तावदेखील केंद्र सरकारला सादर करतील. त्यांच्यावर विचार विनिमय केला जाणार आहे.

    रविवारी कोरोनाचे २६ हजार ३८६ रुग्ण आढळले. गेल्या ८५ दिवसातील हा उच्चांक आहे. त्यामुळे चिंता वाढली असून तातडीनं उपाययोजना करून कोरोनाचा फैलाव रोखणं गरजेचं आहे. त्यासाठी आजच्या बैठकीत काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यातील लॉकडाऊनची परिस्थिती आणि त्यात काही नव्या सूचना केल्या जातात का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.