‘पुरस्कार’ परत करायला निघालेल्या खेळाडूंना पोलिसांनी रोखले

शेतकऱ्यांच्या विरोधात तयार केलेले नवीन कृषी कायदयांना विरोध म्हणून,  आम्ही आमचे पुरस्कार राष्ट्रपतीकडे परत करण्यासाठी निघालों असतानाच आम्हाला ताब्यात घेण्यात- कर्तार सिंग

 

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रपती भावनाकडे निघालेल्या जवळपास ३० खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी अडवले आहे. ‘शेतकऱ्यांच्या विरोधात तयार केलेले नवीन कृषी कायदयांना विरोध म्हणून,  आम्ही आमचे पुरस्कार राष्ट्रपतीकडे परत करण्यासाठी निघालों असतानाच आम्हाला ताब्यात घेण्यात आल्याची’, माहिती कुस्तीपटू कर्तार सिंग यांनी दिली आहे. राष्ट्रपती भावनाकडे निघालेल्या खेळाडूंना मध्ये रोखत पुढे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला.