पोलिओ लसीकरणाचा नवा दिवस ठरला, या दिवशी देशभरातील बालकांना मिळणार लस

३० जानेवारी रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात लहान मुलांना पोलिओची लस पाजण्यात येईल आणि त्यानंतर ३१  जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात ही मोहीम राबवली जाईल. दर वर्षी १७ जानेवारीला देशभरात राष्ट्रीय लसीकरण दिन आयोजित करण्यात येतो. मात्र सरकारनं हा दिवस पुढे ढकलला होता आणि पुढील सूचना येईपर्यंत लसीकरणाचे कार्यक्रम तहकूब करण्याची सूचना केली होती.

भारत सरकारने पोलिओ लसीकरणाची नवी तारीख जाहीर केली आहे. नव्याने ठरवण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ३१ जानेवारी या दिवशी देशभरातल्या बालकांना पोलिओची लस देण्यात येईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे.

३० जानेवारी रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात लहान मुलांना पोलिओची लस पाजण्यात येईल आणि त्यानंतर ३१  जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात ही मोहीम राबवली जाईल. दर वर्षी १७ जानेवारीला देशभरात राष्ट्रीय लसीकरण दिन आयोजित करण्यात येतो. मात्र सरकारनं हा दिवस पुढे ढकलला होता आणि पुढील सूचना येईपर्यंत लसीकरणाचे कार्यक्रम तहकूब करण्याची सूचना केली होती.

० ते ५ या वयोगटातील बालकांना या मोहिमेअंतर्गत पोलिओचे थेंब दिले जातात. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य विभागांना पत्र पाठवून याची माहिती दिली होती. काही कारणास्तव नियोजित पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिवस मोहीम पुढील नोटीस येईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याबाबतची पुढची सूचना १७ जानेवारी पूर्वी देण्यात येईल, असेही या पत्रात नमूद केलं होतं.

दरम्यान १६ जानेवारीपासून देशभरात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार आहे. कोरोनाची लस अगोदर आरोग्य सेवकांना आणि नंतर ५० वर्षांवरील नागरिकांना दिली जाईल. त्यानंतर ३१ डिसेंबरला देशभरातील बालकांना पोलिओची लस दिली जाईल.