कृषी कायद्यांना विरोध  आंदोलनात हिंसाचाराची शक्यता- गुप्तचर यंत्रणांचा इशारा  

आंदोलनात समजाकंटकांचा प्रवेश होऊ नये यासाठी गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. प्रत्येक हालचालीवर करडी नजर असून ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे व बॉडी वार्मरद्वारेही आंदोलनावर नजर ठेवली जात आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशात (UP ) कृषी कायद्यांविरोधात ( Farmer low )सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात हिंसाचार उसळण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दिल्लीकडे कूच करतेवेळी संघर्षाची स्थिती उद्भवू शकते असा इशारा गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दिला. या इनपुटनंतर सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून एनसीआर (NCR ) भागात तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात पीएसी तैनात करण्यात आले आहेत. झोन तसेच रेंजर स्तरावरील पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस आयुक्तांनाही सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. या आंदोलनात समजाकंटकांचा प्रवेश होऊ नये यासाठी गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. प्रत्येक हालचालीवर करडी नजर असून ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे व बॉडी वार्मरद्वारेही आंदोलनावर नजर ठेवली जात आहे.

सुरक्षेत वाढ
दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असून हरयाणा, उत्तर प्रदेश, गुजरातसह अन्य राज्यातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात आहेत. गुप्चतर विभागाने पूर्वांचलमधील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होऊ शकतात अशी माहिती दिली आहे. सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्योन तणावसदृश स्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे, सावधगिरीचा पर्याय म्हणून आयजी मेरठ झोन प्रवीणकुमार यांनी शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच आरआरएफ, पीएसी आणि अनेक पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला आहे.