प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर : अभिजीत मुखर्जी

अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करत प्रणव मुखर्जी यांच्या वैद्यकीय प्रकृत्ती बाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि डॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे माझे वडीलांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असुन त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा. अशा आशयाचे ट्विट अभिजित मुखर्जी यांनी केले आहे.

दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्यावर डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली उपचार सुरु असल्याचे अभिजित मुखर्जी यांनी सांगितले आहे. प्रणव मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवर आहेत. 

अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करत प्रणव मुखर्जी यांच्या वैद्यकीय प्रकृत्ती बाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि डॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे माझे वडीलांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असुन त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा. अशा आशयाचे ट्विट अभिजित मुखर्जी यांनी केले आहे. 

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट २०२० रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या मेंदूतील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रीया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर ते कोमामध्ये होते. तसेच त्यांना कोरोनाची देखील लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांची कोरोनाशी झुंजही सुरुच आहे. प्रणव मुखर्जी हे २०२१ ते २०१७ या काळात देशाचे १३ वे राष्ट्रपती होते.