पावसाळी अधिवेशनाची तयारी; लस घेतलेल्या खासदरांना आरटी-पीसीआर चाचणीत सूट

कोरोना लसीचे एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्या खासदारांना अधिवेशन काळात संसदेत प्रवेशासाठी आरटी-पीसीआर चाचणी करण्याची गरज नसल्याचे मत तज्ज्ञांनी वर्तवले आहे. मात्र, लसीचा एकही डोस घेतलेला नाही अशा खासदारांना अधिवेशन काळात दर दोन आठवड्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. आतापर्यंत राज्यसभेच्या 205 खासदारांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 16 खासदरांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे राज्यसभेत 231 पैकी 221 खासदारांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला आहे.

    दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे, त्यासाठी तयारी सुरू आहे. याआधीच्या अधिवेशनासाठी खासदारांना आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक होते. मात्र, या अधिवेशनासाठी कोरोना लस घेतल्याने अनेक खासदारांना आरटी-पीसीआर चाचणीमधून सूट मिळू शकते. कोरोना लसीचे एक किंवा दोन डोस घेतलेल्या खासदरांना आरटीपीसीआर चाचणीतून सूट मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांनी कोरोना लस घेतली आहे.

    कोरोना लसीचे एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्या खासदारांना अधिवेशन काळात संसदेत प्रवेशासाठी आरटी-पीसीआर चाचणी करण्याची गरज नसल्याचे मत तज्ज्ञांनी वर्तवले आहे. मात्र, लसीचा एकही डोस घेतलेला नाही अशा खासदारांना अधिवेशन काळात दर दोन आठवड्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. आतापर्यंत राज्यसभेच्या 205 खासदारांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 16 खासदरांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे राज्यसभेत 231 पैकी 221 खासदारांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला आहे.

    राज्यसभेच्या 6 खासदरांनी प्रकृती असस्वास्थामुळे कोरोना लस घेतलेली नाही. लोकसभेच्या 540 खासदारांपैकी 470 खासदारांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला आहे. तर 79 टक्के खासदारांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्लानुसार 87.03 टक्के खासदरांना अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आरटी- पीसीआर चाचणी करण्याची गरज नाही.

    राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 7 जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी बैठक घेतली. त्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही सहभागी झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणे या अधिवेशनातही कोरोना नियमांचे आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले.