राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर, मंगळवारी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

शनिवारी राष्ट्रपतींच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. आर्मी रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते आहे. सकाळच्या सुमाराला अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

    भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती आता स्थिर असून मंगळवारी त्यांच्यावर बायपास सर्जरी होण्याची शक्यता आहे. सध्या काळजी करण्यासारखं काहीही कारण नसून सर्व चाचण्यांचे अहवाल नॉर्मल आल्याचं राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आलंय.

    शनिवारी राष्ट्रपतींच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. आर्मी रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते आहे. सकाळच्या सुमाराला अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

    तपासणीनंतर कुठलंही चिंतेचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र सध्याच्या कोरोना काळात अचानक छातीत दुखू लागल्यामुळे कुठलाही वेळ न दवडता राष्ट्रपतींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आणि सर्व चाचण्या करण्यात आल्या. सर्व चाचण्यांचे निकाल समाधानकारक असून सध्या तरी चिंतेचं काही कारण दिसत नसल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितल्याची माहिती समजते आहे. मंगळवारी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.