
दिल्ली : कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. सरकारच्या मनात आलं तर शेतकरी आंदोलन काही मिनिटांत संपेल असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शेतकरी आंदोलन प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.
जर नरेंद्र मोदी यांनी स्वतःहून शेतकरी आंदोलनात हस्तक्षेप केला, तर चमत्कार होईल. केवळ पाच मिनिटांत आंदोलनातप्रश्नी तोडगा निघेल, तसेच सरकारने मनात आणल्यास चर्चा करुन अवघ्या काही तासात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्ली हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलन गेल्या 20 दिवसांपासून सुरुच आहे. केंद्राने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्दच करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.