narendra modi blessing to deputy chairperson

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, “ज्या खासदारांनी हल्ला करून त्यांचा अपमान केला त्या खासदारांना चहा देण्यासाठी हरिवंश जी पोहचले. " पीएम मोदी म्हणाले, "हे हरिवंश जींचे मोठेपणा दर्शवते, मी संपूर्ण देशासह त्यांचे अभिनंदन करतो."

दिल्ली : रविवारी राज्यसभेत शेतकर्‍यांशी संबंधित विधेयक मांडलं जात होतं, तेव्हा उपसभापती हरिवंशही (Deputy Speakers)  खुर्चीवर बसले होते. या काळात खासदारांनी बराच गोंधळ घातला आणि नियम पुस्तिका फाडली होती. त्याचवेळी माईक तोडण्यात आला. त्यानंतर गोंधळ घालून शेतकऱ्यांशी संबंधित विधेयक आवाजी मताद्वारे मंजूर केले.

यासंदर्भात निषेध करण्यासाठी राज्यसभेच्या सर्व आठ निलंबित खासदारांनी रात्रभर निदर्शने केली आणि सर्व निलंबित खासदार अजूनही संसद संकुलातील गांधी पुतळ्याजवळ उभे आहेत. ( protesting MPs)  ज्यांच्यासाठी आज सकाळी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश चहा घेऊन या लोकांना भेटण्यासाठी संसद संकुलात पोहोचले.


पीएम मोदी (Prime Minister Modi ) यांनीही आज सकाळी या विषयावर ट्वीट केले आणि त्यात लिहिले की, “शतकानुशतके बिहार देशाला लोकशाहीच्या सामर्थ्याची जाणीव करून देत आहे. आज सकाळी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश जी ज्या पद्धतीने वागले आहेत, ते लोकशाहीच्या चाहत्यांना नक्कीच अभिमान वाटेल.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, “ज्या खासदारांनी हल्ला करून त्यांचा अपमान केला त्या खासदारांना चहा देण्यासाठी हरिवंश जी पोहचले. ” पीएम मोदी म्हणाले, “हे हरिवंश जींचे मोठेपणा दर्शवते, मी संपूर्ण देशासह त्यांचे अभिनंदन करतो.”


निलंबित खासदारांनी ज्या प्रकारे रात्रभर प्रदर्शन केले आणि आता उपसभापती हरिवंश चहा घेऊन संसदेत पोहोचले आहेत. यावरून हे स्पष्ट झाले की अध्यक्ष हरिवंश यांनी त्यांच्या उत्तम व्यक्तिमत्त्वाचे उदाहरण दिले आहे, आता निलंबित खासदार हे आपुलकी कसे घेतात हे पहावे लागेल.