एकटी बाई सगळ्यांना भारी पडली ! पंतप्रधान मोदी, अमित शहांना धक्का; एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींची सत्ता

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी इथे तळ ठोकला होता. प्रचारसभा, रॅली, रोड शो करत भाजपने प्रचाराचा चांगलाच धुराळा उडवला होता. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा जाहीर निकाल येण्याआधीच एक्झिट पोलच्या आकडेवारीने पंतप्रधान मोदी, अमित शहांना धक्का दिला आहे. सर्व एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

  दिल्ली : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी इथे तळ ठोकला होता. प्रचारसभा, रॅली, रोड शो करत भाजपने प्रचाराचा चांगलाच धुराळा उडवला होता. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा जाहीर निकाल येण्याआधीच एक्झिट पोलच्या आकडेवारीने पंतप्रधान मोदी, अमित शहांना धक्का दिला आहे. सर्व एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

  पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींची तृणमूल सत्ता राखण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये १०९ ते १२१ जागांवर कमळ फुलण्याची शक्यता आहे. तर, सर्वाधिक जागा जिंकत पश्चिम बंगालमध्ये पून्हा एकदा तृणमूलची सत्ता येणार आहे.

  पश्चिम बंगालमध्ये आज आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांचं मतदान झाले. त्याआधी आसाम,केरळ, तामिलनाडु आणि पुद्दुचेरीमधील निवडणुका संपल्या आहेत. २ मे रोजी बंगालसह सर्व राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.

  जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये तृणमूल आघाडीवर आहे. त्याखालोखाल भाजप मुंसडी मारताना दिसत आहे. राज्यात भाजपच्या जागा वाढल्या तरी भाजप सत्तेपासून दूरच राहील. तृणमूलच्या जागांमध्ये घट होण्याचा अंदाज आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तृणमूलला एकूण २९४ जागांपैकी २११ जागा मिळाल्या होत्या. या वेळी पक्षाला १५१ जागा मिळतील आणि पक्षाला बहुमत मिळेल.

  Assembly Election 2021 Exit Poll

  रिपब्लिक – सीएनएक्स
  तृणमूल काँग्रेस : १४३
  भाजप : १३३
  काँग्रेस + डावे : १६
  इतर : ०

  टीव्ही 9- पोलस्ट्राट ( TV9-POLSTRAT Exit Poll 2021)
  तृणमूल (TMC) – १४२ ते १५२
  भाजप (BJP) – १२५ ते १३५
  डावे + काँग्रेस (LEFT+ Congress) – १६ ते २६

  एबीपी सी व्होटर ( ABP-CVoter)
  तृणमूल : १५२ -१६४
  भाजप : १०९-१२१
  डावे + काँग्रेस: १४-२५