संसदेवरील हल्ला विसरणार नाही-पंतप्रधान  मोदी

या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या शौर्य आणि त्याग भारतीयांच्या सदैव स्मरणात राहील. देश त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहील,

 

दिल्ली: संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्याचे देशाला विस्मरण होऊ शकत नाही. या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या शौर्य आणि त्याग भारतीयांच्या सदैव स्मरणात राहील. देश त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. हुतात्म्यांच्या शौर्य आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्विट मोदी यांनी केले आहे.

उल्लेखनीय आहे की, संसदेवरील हल्ल्याच्या घटनेला रविवारी १९ वर्षे पूर्ण झाली. १३ डिसेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी देशाच्या संसदेवर हल्ला केला होता. पाच बंदुकधारी दहशतवाद्यांनी संसदेच्या परिसरावर हल्ला करत तिथे अंधाधुंद असा गोळीबार केला होता. दहशतवादी हल्ल्यादरम्यान संसदेच्या संरक्षणार्थ प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी श्रद्धांजली वाहिली. २००१ मध्ये लोकशाहीचे मंदिर संसद भवनावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये शत्रूंशी दोन हात करणाऱ्या भारतमातेच्य वीर पुत्रांना मी कोटी कोटी नमन करतो. कृतज्ञ राष्ट्र आपल्या अमर बलिदानासाठी सदैव ऋणी राहील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.