Prime Minister Narendra Modi, Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar have wished Indian Army Day

देशभरात १५ जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जातो.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार व्यक्त केले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली : देशभरात १५ जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जातो.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार व्यक्त केले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतमातेचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक क्षणी जागरुक असणाऱ्या देशातील पराक्रमी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं लष्कर बलवान, धैर्यवान आणि दृढ आहे. ज्यांनी नेहमीच भारताची शान अभिमानाने उंचावले आहे. मी सर्व देशवासियांच्या वतीने भारतीय सैन्याला अभिवादन करतो अस ट्विट मोदींनी केले आहे.

‘तुम्ही आहात, म्हणून आम्ही निश्चिंत’ असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सरहद्दीवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय संरक्षण दलांतील अधिकारी, जवान बांधवांच्या अतुलनीय धैर्य, शौर्य, त्याग, बलिदान, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना ‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

१५ जानेवारी १९४९ रोजी तत्कालिन लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी देशाचे ‘कमांडर इन् चीफ’ म्हणून सूत्रे स्विकारली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या सन्मानार्थ साजरा होत असलेला भारतीय सैन्य दिवस हा भारतीय सैन्याबद्दलचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.

देशाच्या संरक्षणासाठी रणरणत्या वाळवंटात, अंग गोठवणाऱ्या थंडीत आपले सैनिक कर्तव्य बजावत असतात. देशवासियांच्या संरक्षणासाठी स्वत:च्या प्राणांचं बलिदान करतात. त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेला तोड नाही. सैन्यदलातील अधिकारी व जवानांचा, त्यांच्या कुटुंबियांचा आम्हाला अभिमान असून देशवासीय सदैव त्यांचे कृतज्ञ राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्य दलांचा गौरव करुन शहीद वीरांना अभिवादन केले.