पंतप्रधान नरेंद मोदी हेच कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ आहेत; इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद मोदी हेच कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ आहेत, असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी केला आहे. कारोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाच मोदींनी देशातील पाच राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभा घेण्यासाठी तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सहमती दर्शविल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. देशात जानेवारी २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हाही मोदींनी कोरोना संकटाकडे गांभिर्याने पाहिले नाही, असे डॉ. दहिया म्हणाले.

    दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी हेच कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ आहेत, असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी केला आहे. कारोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाच मोदींनी देशातील पाच राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभा घेण्यासाठी तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सहमती दर्शविल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. देशात जानेवारी २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हाही मोदींनी कोरोना संकटाकडे गांभिर्याने पाहिले नाही, असे डॉ. दहिया म्हणाले.

    आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही कोरोना परिस्थितीवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी रुग्ण दगावत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासंदर्भातील होकार केंद्राने न दिल्याने प्रकल्प रडखले आहेत. मोदी सरकारने या गोष्टींना फार महत्व दिले नाही असा आरोप डॉ. दहिया यांनी केला.

    शेतकरी आंदोलनासंदर्भातही पंतप्रधान मोदींनी योग्य ते निर्णय घेतले नाहीत. मोठ्या प्रमाणात आंदोलक शेतकऱ्यांना एकत्र येऊ दिले. प्रश्न सोडवण्यापेक्षा आंदोलन होऊ दिले आणि त्या माध्यमातून कोरोनाचा धोका वाढला, असेदेखील डॉ. दहिया म्हणाले.

    कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचारी काम करत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांनी मोठय़ा प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केले आहे.

    - डॉ. नवज्योत दहिया, उपाध्यक्ष आयएमए