पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशभरात कृषी कायद्यांना विरोध हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान महासंमेलनात कृषी कायद्यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना हमीभावाची ग्वाही देतानाच पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती केली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मागील १५-२० दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले असून, मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भारत बंद आंदोलनही करण्यात आलं.

दिल्ली (Delhi).  देशभरात कृषी कायद्यांना विरोध हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान महासंमेलनात कृषी कायद्यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना हमीभावाची ग्वाही देतानाच पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती केली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मागील १५-२० दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले असून, मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भारत बंद आंदोलनही करण्यात आलं.

मध्य प्रदेशमध्ये किसान महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,”मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांवर चर्चा सुरू आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे हे कायदे एका रात्रीत तयार करण्यात आले नाहीत. मागील २०-२२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारनं यावर समग्रपणे चर्चा केली आहे,” असं मोदी म्हणाले.

“मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचं सगळं श्रेय तुम्ही घ्या. याचं सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे,” असं म्हणत मोदी यांनी सर्व पक्षांना आवाहन केलं.

“आज देशातील सर्वच राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे बघितले. त्यांची जुनी भाषणं ऐकली. जे कृषि मंत्रालय सांभाळत होते, त्यांची पत्र वाचली तर आज कृषी क्षेत्रात जे बदल करण्यात आले आहेत. ते वेगळे नाहीत. आमचं सरकार शेतकरी समर्पित असून, आम्ही फाईलींच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आलेल्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि शिफारशी लागू केल्या. हमीभावात दीड टक्क्यांनी वाढ केली,” असं म्हणत मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधलं.