पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी देश लॉकडाऊन केला होता. दोन महिन्यांच्या कालावधी नंतर देशातील लॉकडाऊन हटवून अनलॉक होत आहे. परंतु कोरोना

 नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी देश लॉकडाऊन केला होता. दोन महिन्यांच्या कालावधी नंतर देशातील लॉकडाऊन हटवून अनलॉक होत आहे. परंतु कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नेरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.

देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्याचे सरकार आणि आरोग्य सेंवासमोर आव्हान होऊन बसले आहे. मात्र सुमारे सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीनंतर देश टप्या टप्याने अनलॉक करत आहेत. परंतु कोरोना विषाणू आता रौद्ररुप धारण करताना दिसत आहे. याला आळा घालण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जून २०२० रोजी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी तसेच केद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करणार आहेत. कोरोनाला रोखण्यासाठीच्या रणरनीती संबंधीत चर्चा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जून रोजी बैठक घेणार आहेत त्यात आसाम, केरळ, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, नागालँड, मेघालय, पुदुच्चेरी, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. तसेच चंदिगड, लडाख, दादरा नगर हवेली, आंदमान निकोबार, दमण दीव आणि लक्षद्विप या केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होतील.