narendra modi

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना परिस्थिती, तसेच अनलॉकचा होणारा परिणाम. कोरोना चाचण्यांचा वेग आणि कोरोनावरील उपाययोजनांचा आढावा तसेच नवीन रणनीती याबद्दल चर्चा करणार आहेत.

दिल्ली : जगभरासह देशातील कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रकोप वाढला आहे. देशावरील कोरोना संकट अधिकच गडद होताना दिसत आहे. मागील आठवड्यांपासून देशात दिवसाला ९० हजार ते लाखात कोरोना रुग्णांची नोंद आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाबतची भीषणता दृढ झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) पुन्हा एकदा राज्य सरकारांशी बैठक ( meeting )घेणार आहेत. बुधवारी नरेंद्र मोदी कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह (Chief Ministers of 7 states)  बैठक घेणार आहेत.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना परिस्थिती, तसेच अनलॉकचा होणारा परिणाम. कोरोना चाचण्यांचा वेग आणि कोरोनावरील उपाययोजनांचा आढावा तसेच नवीन रणनीती याबद्दल चर्चा करणार आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्र, आंध्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांत जास्तप्रामाणता आहेत. तर दिलासादायक बाब ही आहे की, देशात कोरोना रुग्णांचा आकाडा वाढता असला तरी त्यांचे बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे.