पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाले…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ट्वीट (Tweet) करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा (Best Wishes From PM Modi) दिल्या आहे.

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज ८० वा वाढदिवस (80th Birthday) आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर कोरोनाच्या नियमांचं (Corona Guidelines) पालन करत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ट्वीट (Tweet) करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा (Best Wishes From PM Modi)  दिल्या आहे.

शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही पवारांवर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!

दरम्यान, गेली पाच दशके महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले शरद पवार राजकारणाचं विद्यापीठ म्हणून देशात ओळखले जातात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या यशवंतराव प्रतिष्ठान केंद्रात विशेष आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये अशी विनंती पवार कुटुंबाकडून करण्यात आली आहे.