गणेशोत्सवानिमित्त सर्व देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरद्वारे सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपणां सर्वांना गणेशोत्सवाच्या खुप-खुप शुभेच्छा ! गणपती बाप्पा मोरया !

दिल्ली : देशभरात आज गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. कोरोनाचे संकट असतानाही नागरिक मोठ्या उत्साहात बाप्पांचे आगमन होत आहे. अनेक घरांत बाप्पांचे काल आगमन झाले आहे तर काही नागरिक आज पहाटेपासून बाप्पांचे आगमन होत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरद्वारे सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपणां सर्वांना गणेशोत्सवाच्या खुप-खुप शुभेच्छा ! गणपती बाप्पा मोरया ! तुमच्यावर गणेशाची कृपा कायम राहो. सर्वत्र आनंद आणि भरभराट होवो. असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.