पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकी नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनामुळे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. मोदी याच्या काकी नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्या ८० वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. मोदी याच्या काकी नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्या ८० वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू प्रल्हाद मोदी यांनी नर्मदाबेन मोदी यांचं निधन झाल्याची माहिती दिली. कोरोना संसर्ग झाल्यामुळे नर्मदाबेन यांना दहा दिवसांपूर्वी सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

    कोरोना संसर्गामुळे त्यांची प्रकृती दिवसे न् दिवस खालावत होती. आज त्यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली, असं प्रल्हाद मोदी यांनी सांगितलं.
    नर्मदाबेन यांचे पती जगजीवनदास मोदी यांचं यापूर्वीच निधन झालं आहे. जगजीवनदास मोदी हे नरेंद्र मोदी यांचे वडील दामोरदास मोदी यांचे लहान भाऊ होते.