लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा; 11 ते 14 एप्रिल दरम्यान विशेष मोहिम

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात कोरोना रुग्ण वाढण्याचे नेमके कारणही त्यांनी सांगितले. कोरोना लसीकरणाच्या नादात आपण कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष केले आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाल्याचे मोदी म्हणाले.

    दिल्ली : लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा केली आहे. येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.

    सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात कोरोना रुग्ण वाढण्याचे नेमके कारणही त्यांनी सांगितले.
    कोरोना लसीकरणाच्या नादात आपण कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष केले आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाल्याचे मोदी म्हणाले.

    कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग आदी गोष्टी पाळण्याबाबत जनजागृती केली पाहिजे. सर्व राज्यांनी कोरोना टेस्टिंगची व्याप्ती वाढवावी. 70 टक्के RT-PCR टेस्ट झाल्या पाहिजेत. देशातील, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, परंतू चाचण्या वाढवायला हव्यात. योग्य पद्धतीने स्वॅब घेणे खूप गरजेचे आहे, तसेच त्याची चाचणी होणेदेखील खूप महत्वाचे आहे, अशा सूचनाही मोदींनी केल्या.