Production of breast milk for the first time in the laboratory; Ready to sell on the open market

नवजात शिशुच्या मानसिक व शारीरिक वाढीसाठी आईचे दूध सर्वोत्तम मानण्यात आले आहे. तंत्रज्ञानामध्ये इतका विकास झाला आहे की, नवजात बाळांसाठी ब्रेस्ट मिल्कला सायन्स लॅबमध्ये तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लावण्यात आला आहे. बायोमिल्क नावाच्या एका स्टार्टअपने महिलांच्या स्तनाच्या कोशिकांपासून दूध तयार करण्यात यश मिळविले आहे. या कंपनीत बहुतांशी महिलाच आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या दुधातमोठ्या संख्येत सर्व पौष्टिक तत्त्व आहे जे आईच्या दुधात आढळतात.

  दिल्ली : नवजात शिशुच्या मानसिक व शारीरिक वाढीसाठी आईचे दूध सर्वोत्तम मानण्यात आले आहे. तंत्रज्ञानामध्ये इतका विकास झाला आहे की, नवजात बाळांसाठी ब्रेस्ट मिल्कला सायन्स लॅबमध्ये तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लावण्यात आला आहे. बायोमिल्क नावाच्या एका स्टार्टअपने महिलांच्या स्तनाच्या कोशिकांपासून दूध तयार करण्यात यश मिळविले आहे. या कंपनीत बहुतांशी महिलाच आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या दुधातमोठ्या संख्येत सर्व पौष्टिक तत्त्व आहे जे आईच्या दुधात आढळतात.

  स्वत:च्या अनुभवातून संशोधन

  आईच्या दुधाची निर्मिती करण्याची कल्पनाही लैला स्ट्रिकलँड यांची आहे. त्या गरोदर असताना नऊ महिने पूर्ण होण्याआधीच बाळाला जन्म द्यावा लागला. वैद्यकीय अडचणींमुळे त्यांना बाळाला दूध पाजण्यात अडचणी जाणवत होत्या. त्यांच्या शरीरात दूध निर्मिती न झाल्याने बाळाला दूध पाजता येत नव्हते.

  असे सुरू झाले स्टार्टअप

  आईच्या दुधातील पोषकतत्त्वांपेक्षा हे दूध चांगले असल्याचा दावा संबंधित कंपनीने केला आहे. लैला स्ट्रिकलँड या संशोधिकेने 2013 मध्ये प्रयोगशाळेत मेमरी पेशी निर्माण करण्याचे काम हाती घेतले. 2019 मध्ये त्यांनी फूडसायन्स तज्ज्ञ मिशेन इग्गेर यांच्यासोबत भागीदारी केली. या दोघांनी मिळून स्वतःचा स्टाटर्अप ‘बायोमिल्क’ सुरू केला.

  लवकरच येणार बाजारात

  प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आलेल्या मेमरी पेशींनी दूधात आढळणारे दोन मुख्य पदार्थ शर्करा आणि केसीन तयार केल्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात दोघींनी केली होती. त्यानंतर मातेचे दूध तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला. पुढील 3 वर्षांमध्ये हे दूध बाजारात उपलब्ध होणार असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे.