पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अखेर दिला राजीनामा

अमरिंदर सिंग यांच्या विरोधात ४० आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे

    पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंर्तगत गटबाजी चव्हाट्यावर आली असून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग (unjab Chief Minister Captain Amarinder Singh)यांनी आज अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. कॅप्टन अमरिंगदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

    दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात ४० आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. पंजाब मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. साडे चार वाजता पंजाब राज भवन गेट येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.