पंजाबचे मुख्यमंत्री दिल्लीला रवाना, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता

पीएम मोदींची (PM Modi) भेट घेणार असून कृषी सुधारणा कायदा मागे घेण्याची, पीक खरेदीला विलंब न करण्याची आणि करतारपूर कॉरिडोर उघडण्याची मागणी करणार आहे. त्याचवेळी, नवज्योत सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस हायकमांडसोबत सीएम चन्नी (Charanjit Channi) यांची ही पहिली भेट आहे.

    पंजाबमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amarinder Singh)  यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानतंर चरणजित चन्नी (Charanjit Channi) यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. काल (गुरूवार) झालेल्या बैठकीनंतर नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांचे मन वळविण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. आज (शुक्रवार) पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दुपारी 4 वाजता बैठक घेणार आहेत. तसेच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    पीएम मोदींची भेट घेणार असून कृषी सुधारणा कायदा मागे घेण्याची, पीक खरेदीला विलंब न करण्याची आणि करतारपूर कॉरिडोर उघडण्याची मागणी करणार आहे. त्याचवेळी, नवज्योत सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस हायकमांडसोबत सीएम चन्नी यांची ही पहिली भेट आहे.

    सिद्धूंचे मन वळवण्यासाठी घेतलेला मार्ग सरकारच्या अडचणी वाढवू शकतो अशी चर्चा आहे. लोकांमध्ये सरकारबद्दल चुकीची प्रतिमाही निर्माण होऊ शकते. सीएम चन्नी दिल्ली दौऱ्यात हायकमांडसमोरही हा विषय घेऊ शकतात.