आर. आश्विनचा खुलासा; मीच दोषी नाही, पंतने मदतच केली नाही

भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली असली तरी भारतीय संघाकडून मोठ्या चूका झाल्या असल्याचे उघड झाले आहे. भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने या मालिकेत ३२ गडी टिपले पण डीआरएस घेण्याबाबत मात्र त्याचे निर्णय चुकले.

    दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सर्वोत्तम कामगिरी केली. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारताने पुढील तीन सामने जिंकले आणि मालिका ३-१ ने खिशात घातली. भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली असली तरी भारतीय संघाकडून मोठ्या चूका झाल्या असल्याचे उघड झाले आहे. भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने या मालिकेत ३२ गडी टिपले पण डीआरएस घेण्याबाबत मात्र त्याचे निर्णय चुकले. यावर बोलताना निर्णय चुकले म्हणून मीच जबाबदार नाही तर ऋषभ पंतने मदतच केली नसल्याचे तो म्हणाला.

    भविष्यात काळजी घेणार
    पंतला चेंडूचा अँगल आणि उसळी याचा योग्य अंदाज घेता आला नाही. त्यामुळेच मला त्याच्याकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही, असे अश्विन म्हणाला. ज्या पद्धतीने लोक मला डीआरएस बाबत पाहत आहेत त्यात बदल करण्याची गरज आहे. इंग्लंडविरुद्ध या मालिकेआधी डीआरएसबाबतचे माझे अंदाज बऱ्यापैकी बरोबर ठरले होते. चेंडू कोणत्या लाइनवरून हिट झाली अथवा नाही याची मला कल्पना असते. पण तो किती उसळी घेतोय आदी बाबत मला विकेटकिपरची मदत गरजेची असते, असेही तो म्हणाला. यासोबतच भविष्यात डीआरएस घेण्याबाबत मी अधिक काळजी घेइन, असेही अश्विन म्हणाला.