Selling banks is a mistake; Raghuram Rajan warns government

भारत सरकारमध्ये सध्या नेतृत्वाचा अभाव असून नियोजनात हे सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका रघुराम राजन यांनी केलीय. गेल्या वर्षीच्या शेवटी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट झाल्यानंतर आपण कोरोनावर विजय मिळवल्याची शेखी हे सरकार मिरवत राहिलं. त्यातून सरकारची केवळ आत्मसंतुष्टता दिसली. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट ओळखण्याची दूरदृष्टीदेखील या सरकारमध्ये नव्हती, अशी टीका राजन यांनी केलीय. 

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातलाय. दररोज ३ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचं नियोजन पूर्णतः चुकल्याची किंबहूना, केंद्र सरकारनं नियोजन केलं नसल्याची टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलीय.

    भारत सरकारमध्ये सध्या नेतृत्वाचा अभाव असून नियोजनात हे सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका रघुराम राजन यांनी केलीय. गेल्या वर्षीच्या शेवटी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट झाल्यानंतर आपण कोरोनावर विजय मिळवल्याची शेखी हे सरकार मिरवत राहिलं. त्यातून सरकारची केवळ आत्मसंतुष्टता दिसली. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट ओळखण्याची दूरदृष्टीदेखील या सरकारमध्ये नव्हती, अशी टीका राजन यांनी केलीय.

    ब्राझीलसारख्या देशातही जर दुसरी लाट येऊ शकते, तर ती भारतातही येऊ शकते, याची तयारी केंद्र सरकारने ठेवणे अपेक्षित होते. मात्र केंद्र सरकार स्वतःचे गोडवे गाण्यातच मग्न राहिल्याचं ते म्हणाले. सध्या सर्वांनी वेगानं काम करण्याची गरज असून कोरोनासोबत लॉकडाऊनच्या संकटावरही उपाय शोधण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त  केलं.

    रघुराम राजन यांच्या टीकेचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असून नोटाबंदीवरून झालेले मतभेद अद्यापही कायम असल्याचं दिसून आलंय. नोटाबंदीच्या निर्णयाला रघुराम राजन यांनी विरोध करत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर काही काळाने नोटाबंदीची घोषणा झाली होती.