rahul priyanka left for hathras

हाथरसमध्ये पिडितेच्या घराबाहेर पोलिसांनी गेले दोन दिवस कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तरीही राहुल गांधी आज पुन्हा पिडित कुटुंबाला भेटीला जाणार आहेत. आज ते पुन्हा एकदा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही खासदार देखील उपस्थित राहणार आहेत.

दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सरचिटणीस प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi) गुरुवारी हाथरस (Hathras) येथील सामूहिक बलात्कार पिडित कुटुंबाच्या भेटीसाठी गेले होते. परंतु पोलिसांनी त्यांना यमुना एक्सप्रेस वेवर अडवले होते. यावेळी राहुल गांधी हे पायी चालत जात असताना पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आले तसेच धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर वातावरण चिघळल्याने पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधींसोबत २०० जणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. परंतु आज पुन्हा राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरस सामूहिक बलातक्तार पिडित कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार असल्याचे समजते आहे.

हाथरसमध्ये पिडितेच्या घराबाहेर पोलिसांनी गेले दोन दिवस कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तरीही राहुल गांधी आज पुन्हा पिडित कुटुंबाला भेटीला जाणार आहेत. आज ते पुन्हा एकदा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही खासदार देखील उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे.