‘महंगाई का विकास जारी, अच्छे दिन देश पे भारी’, राहुल गांधींचा मोदींवर जोरदार हल्लाबोल

देशातील वाढती महागाई, कोरोना महामारी , बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्था यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. परंतु आज टीकास्त्र सोडताना राहुल गांधी यांनी कॉंप्रेस्ड नॅचरल गॅस आणि पाइप्ड नॅचरल गॅस  यांच्या वाढत्या किमतींवरुन निशाणा साधला आहे.

    गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या प्रादुर्भावासह पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. तसेच महागाई ही कमी न होता वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

    कोरोना काळात तेलाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे राहुल गांधी ट्वीट करत म्हणाले की, ‘महंगाई का विकास जारी, अच्छे दिन देश पे भारी, पीएम की बस मित्रों को जवाबदारी’