ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटJanuary, 01 1970

पंतप्रधान मोदी प्रसंगी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील, राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राहुल गांधींची टीका

ऑटो अपडेट
द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
12:35 PMDec 24, 2020

लोकशाही केवळ कल्पनेत, प्रत्यक्षात नाही

भारतात सध्या लोकशाही नसल्याची टीका राहुल गांधींनी केलीय. लोकशाही असलीच, तर ती केवळ कल्पनेत आहे, असं त्यांनी म्टलंय.

12:29 PMDec 24, 2020

पंतप्रधान मोदी प्रसंगी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील - राहुल गांधी

देशातील भांडवलशहांचे खिसे भरण्याचं काम मोदी सरकार करत आहेत. त्यांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाला ते देशद्रोही ठरवत आहेत, असा आरोप काँग्रेस नेेते राहुल गांधींनी केलाय. शेतकरी, कामगार आणि वेळ आलीच तर मोहन भागवत यांनाही ते देशद्रोही ठरवतील, अशी टीका त्यांनी केलीय.

12:16 PMDec 24, 2020

राहुल गांधींसह तिघांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

राहुल गांधींसह तिघांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या मागणीचं निवेदन त्यांना दिलं. शेतकरी आंदोलन प्रश्नात राष्ट्रपतींनी लक्ष घालावं, अशी मागणी त्यांनी केलीय. राहुल गांधींसोबत गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनीदेखील राष्ट्रपतींची भेट घेतली.

12:06 PMDec 24, 2020

काँग्रेस शक्तीमान की कमजोर, हे एकदा भाजपनं नक्की ठरवावं

काँग्रेस कमजोर आहे, अशी टीका भाजप करते. दुसरीकडे लाखों शेतकऱ्यांचा मोर्चा हे काँग्रेसचे कारस्थान आहे, असेही म्हणते. आपली एक भूमिका भाजपने निश्चित करावी, असा टोला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी लगावलाय.

11:59 AMDec 24, 2020

प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रपती भवनावर मोर्चा घेऊन चाललेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

11:50 AMDec 24, 2020

खासदारांकडून राष्ट्रपतींना कुठला धोका?

राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी जाणारे सर्वजण लोकांनी निवडून दिलेले खासदार आहेत. त्यांच्यापासून राष्ट्रपतींना कसला धोका उद्भवू शकतो, असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी केलाय.

11:47 AMDec 24, 2020

काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी रोखला

विजय चौकापासून राष्ट्रपती भवनावर धडकण्यासाठी सुरू होत असलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांनी रोखलंय. सरकारविरोधातील प्रत्येक आवाज हा सरकारकडून अतिरेकी ठरवला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केलाय.

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, यासाठी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. देशातील सध्याची परिस्थिती ही अभूतपूर्व असून अशा पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी महामहीम राष्ट्रपतींनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याची विनंती काँग्रेसतर्फे केली जाणार आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा थांबली असून दोघंही आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत तोडगा निघण्याची कुठलीही चिन्हं दिसत नाहीत. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत गेल्या महिनाभरापासून शेतकरी ठाण मांडून बसलेत. अनेक शेतकऱी आपल्या प्राणाला मुकत आहेत. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी देशाच्या राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.

विजय चौक ते राष्ट्रपती भवन या दरम्यान हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रपतींना भेटून त्यांना एक निवेदन देण्यात येईल. राष्ट्रपतींनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, या मागणीचं समर्थन करणारं २ कोटी नागरिकांच्या सह्या असणारं पत्र राहुल गांधी राष्ट्रपतींकडे सुपूर्द करतील.

त्यापूर्वी राहुल गांधींनी दिल्लीतील पक्ष कार्यालयात पक्षाचे खासदार आणि वरीष्ठ नेते यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, ज्या नेत्यांना राष्ट्रपती भवनात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे, तेवढ्याच नेत्यांना आत सोडलं जाईल, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२५ सोमवार
सोमवार, जानेवारी २५, २०२१

सातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.