…आणि फालतू घोषणा देणारं सर्वात कुशल मंत्रालय, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात

राहुल गांधी ट्विटर हँडलवरुन सातत्यानं मोदी सरकारवर टिकास्त्र सोडताना दिसत आहेत. राहुल यांनी यावेळी नेटिझन्सलाच प्रश्न विचारुन त्याचं उत्तर देखील स्वत:च देऊन टाकलं आहे. केंद्र सरकारमधील सर्वात कुशल मंत्रालय कोणतं?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आणि त्याच्या उत्तरात मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा करणारं गुप्त मंत्रालय हे केंद्राचं सर्वात कुशल मंत्रालय आहे, असा खोचक टोला राहुल यांनी लगावला आहे.

    कोरोना लसीच्या कमतरतेपासून रुग्णालयात रुग्णांना बेड न मिळण्यापासून अनेक गोष्टींवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

    राहुल गांधी ट्विटर हँडलवरुन सातत्यानं मोदी सरकारवर टिकास्त्र सोडताना दिसत आहेत. राहुल यांनी यावेळी नेटिझन्सलाच प्रश्न विचारुन त्याचं उत्तर देखील स्वत:च देऊन टाकलं आहे. केंद्र सरकारमधील सर्वात कुशल मंत्रालय कोणतं?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आणि त्याच्या उत्तरात मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा करणारं गुप्त मंत्रालय हे केंद्राचं सर्वात कुशल मंत्रालय आहे, असा खोचक टोला राहुल यांनी लगावला आहे.

    कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन महत्वाचं नाही. लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लस मिळायला हवी. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.