तुमची गाडी पेट्रोलवर चालते पण मोदी सरकार..; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा

इंधन दरवाढीमुळे वाढत्या कराचा बोजा सामान्यांवर पडत आहे. त्यावरुन राहुल गांधींनी टीका केली आहे. तुमची गाडी पेट्रोलवर चालते पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

    नवी दिल्ली :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. दिल्लीत पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर ८९.५३ रुपयांवर पोहोचले आहे अशी बातमी शेअर केली आहे.

    इंधन दरवाढीमुळे वाढत्या कराचा बोजा सामान्यांवर पडत आहे. त्यावरुन राहुल गांधींनी टीका केली आहे. तुमची गाडी पेट्रोलवर चालते पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून काँग्रेस पक्ष पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहे आणि ११ जून रोजी पक्षाने हत्याविरोधात देशव्यापी आंदोलनही केले होते.