Rahul Gandhi's dream of Chimukalya fulfilled; Video goes viral

राहुल गांधी यांनी एका चिमुकल्याला अवकाश उड्डाण घडवून आणत त्याला त्याच्या स्वप्नाच्या आणखीन जवळ नेण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हीडिओ शेअर केला. या व्हीडिओत ते 3 एप्रिल रोजी कन्नूरमध्ये एका कॅफेत अद्वैत सुमेश नावाच्या एका अवघ्या सात वर्षांच्या चिमुरड्याशी आपुलकीने संवाद साधताना दिसले होते. मोठे होऊन पायलट बनण्याचे स्वप्न असल्याचे यावेळी चिमुरड्या अद्वैतने म्हटले होते. दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी अद्वैतला विमानाच्या कॉकपीटमध्ये बोलावून घेतलेले या व्हीडिओत दिसत आहे.

    दिल्ली : काँग्रेस नेते आणि केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत निवडणूक प्रचार करताना दिसले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधण्यावर जास्तीत जास्त भर दिला. सगळ्यांशी खेळीमेळीने गप्पा मारल्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही दिली.

    आता राहुल गांधी यांनी एका चिमुकल्याला अवकाश उड्डाण घडवून आणत त्याला त्याच्या स्वप्नाच्या आणखीन जवळ नेण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हीडिओ शेअर केला. या व्हीडिओत ते 3 एप्रिल रोजी कन्नूरमध्ये एका कॅफेत अद्वैत सुमेश नावाच्या एका अवघ्या सात वर्षांच्या चिमुरड्याशी आपुलकीने संवाद साधताना दिसले होते. मोठे होऊन पायलट बनण्याचे स्वप्न असल्याचे यावेळी चिमुरड्या अद्वैतने म्हटले होते. दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी अद्वैतला विमानाच्या कॉकपीटमध्ये बोलावून घेतलेले या व्हीडिओत दिसत आहे.

    राहुल गांधी अद्वैतला घेऊन आपल्या विमानाच्या कॉकपिटमध्ये गेले. विमानाची कंट्रोल सिस्टम दाखवत त्यांनी अद्वैतशी गप्पा मारल्या. कोणतेही स्वप्न खूप मोठे नसते. आम्ही अद्वैतचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिले पाऊल उचलले. आता आपले कर्तव्य आहे की आपण एक असा समाज आणि संरचना तयार करायला हवी जी त्याला उड्डाण घेण्याची संधी उपलब्ध करून देईल, असे राहुल गांधी यांनी या व्हीडिओसोबत सोशल मीडियावर म्हटले.