सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ प्रश्नावर राहुल गांधींनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले…

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आपल्याला या देशद्रोह कायद्याची आवश्यकता आहे का, अशी विचारणा केली. यावर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

    नवी दिल्ली: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊनही ब्रिटिशांनी केलेला देशद्रोहाचा कायदा रद्द का केला जात नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    देशद्रोह कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आपल्याला या देशद्रोह कायद्याची आवश्यकता आहे का, अशी विचारणा केली. यावर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत, आम्ही सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीचे स्वागत करतो, असे म्हटले आहे.