cash

भोपाळमध्ये भ्रष्टाचारच्या आरोपामध्ये एफसीआयच्या एका लिपिकाच्या घरावर छापा मारण्यात आला आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (एफसीआय) लिपीक असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या घरी मोठे घबाड सापडले आहे. लिपिकाच्या घरात तब्बल 2.17 कोटी रुपये, 8 किलो सोने आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे.

    दिल्ली : भोपाळमध्ये भ्रष्टाचारच्या आरोपामध्ये एफसीआयच्या एका लिपिकाच्या घरावर छापा मारण्यात आला आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (एफसीआय) लिपीक असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या घरी मोठे घबाड सापडले आहे. लिपिकाच्या घरात तब्बल 2.17 कोटी रुपये, 8 किलो सोने आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे.

    भ्रष्टाचार प्रकरणाच्या तक्रारी आल्यानंतर सीबीआयच्या एका पथकाने ही कारवाई केली आहे. किशोर मीरा मीणा असे या लिपिकाचे नाव आहे. तो छोला परिसरात राहत असून सीबीआयच्या कारवाई सुरू आहे. सीबीआयकडे मीणाविरोधात लाचेच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच त्याच्या घरातून भ्रष्टाचाराचे पुरावेही सापडले आहेत.

    लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी एफसीआयच्या डिव्हिजनल मॅनेजरसह चौघांना अटक केली आहे. यातील तीन मॅनेजरच्या लाचेची रक्कम किशोर मीणा स्वत:कडेच ठेवत असल्याची माहितीही मिळाली आहे.