Six additional festival trains between Pune and Barauni! Superfast Express will make the journey much faster

भारतीय रेल्वेने अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेऊन ते अविरत मेहनतीने आणि श्रमाने पूर्णत्वास नेले आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील एकमेव अशी रेल्वे भारतात अस्तित्वात आहे जी गेली 70 वर्षे प्रवाशांकडून एकही रुपयाचे तिकिट न घेता अविरतपणे प्रवाशांना सेवा देत आहे. भारत सरकारचा भाक्रा नांगल प्रकल्प 1923 मध्ये बांधून पूर्ण झाला. या प्रकल्पाच्या बांधकामाच्या वेळी ही रेल्वे सुरू करण्यात आली.

  दिल्ली : भारतीय रेल्वेने अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेऊन ते अविरत मेहनतीने आणि श्रमाने पूर्णत्वास नेले आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील एकमेव अशी रेल्वे भारतात अस्तित्वात आहे जी गेली 70 वर्षे प्रवाशांकडून एकही रुपयाचे तिकिट न घेता अविरतपणे प्रवाशांना सेवा देत आहे. भारत सरकारचा भाक्रा नांगल प्रकल्प 1923 मध्ये बांधून पूर्ण झाला. या प्रकल्पाच्या बांधकामाच्या वेळी ही रेल्वे सुरू करण्यात आली.

  कामगारवर्गासाठी व्यवस्था

  पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संयुक्तपणे फाळणीच्या आधी इंग्रजांनी तयार केलेला हा प्रकल्प. या प्रकल्पाचे काम चालू होते त्यावेळी भाक्रा बीयाज मॅनेजमेंट बोर्ड म्हणजेच बीबीएमबी म्हणून एक समिती या प्रकल्पाचे काम जलद गतीने कसे होईल हे बघण्यासाठी नेमण्यात आली होती. या समितीने एक असा प्रस्ताव ठेवला की येथे काम करणारा कामगार वर्ग किंवा कर्मचारी आपल्याला वेळेत प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी एखाद्या रेल्वेची व्यवस्था करण्यात यावी. म्हणून हा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला. या रेल्वेमध्ये रोज 800 कर्मचारी प्रवास करू शकतील अशा क्षमतेची रेल्वे येथे रुजू करण्यात आली.

  लाकडापासून बनविले कोचेस

  या रेल्वेसाठी वापरण्यात आलेले कोचेस हे कराचीमध्ये बनविण्यात आले होते. विशेष म्हणजे या ट्रेनचे सर्व कोचेस हे लाकडापासून बनविण्यात आले आहेत. नंतर 1953 मध्ये या रेल्वेला विद्युत इंजिनही बसवण्यात आले जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. आजही ही रेल्वे दिवसातून कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी दोन फेऱ्या मारते. हा प्रकल्प 740 फूट उंच आहे. बीबीएमबी यांच्या दस्तऐवज अनुसार रेल्वे पहिल्यांदा वाफेवर चालणारे इंजिन वापरून प्रवास करत असे आणि ही रेल्वे पहिल्यांदा 1948 रोजी धावली होती. 1953 मध्ये या रेल्वेला विद्युत आणि इंधन याचे मिश्रण करून वापरण्यात येणारे इंजिन बसविण्यात आले जे अमेरिकन बनावटीचे आहे.

  40 किलोमीटर प्रति तास वेग

  बिलासपूर जिल्ह्यात हिमाचल प्रदेशमध्ये हा प्रकल्प वसवण्यात आलेला आहे. यासंदर्भात ज्यावेळी बीबीएमबीशी संपर्क केला त्यावेळी कुलदीपसिंग जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांनी असे सांगितले की, या रेल्वेमध्ये पर्यटनीय असे काही नाही पण याची खासियत म्हणजे ही रेल्वे मोफत प्रवास देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही रेल्वे जेमतेम 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करू शकते आणि त्यामुळेच या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी लोक लांबून गर्दी करतात.

  विद्यार्थी-शेतकऱ्यांसाठी लाईफलाइन

  ही रेल्वे रोज 13 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. यामध्ये ती शिवालिक पर्वत रांगा ,तळे, जंगल पूर्ण करते त्यामुळे हा प्रवास नयनरम्य असतो. हा प्रवास नांगल आणि पंजाब याच्या दरम्यान असल्यामुळे हिमाचल प्रदेशचे खरे सौंदर्य आपल्याला या रेल्वे प्रवासादरम्यान दिसू शकते. या रेल्वेतून फक्त कर्मचारीच प्रवास करतात असे नाही तर या रेल्वेतून शाळेत जाणारे विद्यार्थी, शेतकरी ही प्रवास करतात. या रेल्वेचे एकूण 6 थांबे असून 25 गावांतील शाळेचे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी देखील ही रेल्वे लाइफलाइन ठरली आहे.

  हे सुद्धा वाचा