Rain of resignations before cabinet expansion; 12 ministers including Raosaheb Danve and Javadekar resigned

मोदी कॅबिनेट विस्तारापूर्वीच जुन्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचा पाऊस पडला. 43 मंत्र्यांच्या शपथिवधीपूर्वीच 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. धक्कादायक म्हणजे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही राजीनामा दिला. या दोघांकडेही महत्त्वाचे विभाग होते.

  दिल्ली : मोदी कॅबिनेट विस्तारापूर्वीच जुन्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचा पाऊस पडला. 43 मंत्र्यांच्या शपथिवधीपूर्वीच 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. धक्कादायक म्हणजे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही राजीनामा दिला. या दोघांकडेही महत्त्वाचे विभाग होते.

  आरोग्य मंत्रालय : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अपयशी, दोन्ही मंत्र्यांना हटविले.

  शिक्षण मंत्रालय : नव्या शैक्षणिक धोरणाचे श्रेय सरकारला मिळालेच नाही. दोन्ही मंत्र्यांना हटविले.

  कामगार मंत्रालय : मजुरांची घरवापसी, सुप्रीम कोर्टाने केलेली कानउघाडणी, असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी पोर्टल न करणे.

  बंगाल पराभवाचा फटका

  बाबुल सुप्रियो मंत्री असतानाही निवडणुकीत पराभूत. तर, देबोश्री चौधरी यांना बंगाल निवडणुकीत छापच सोडता आली नाही.

  डॉ. हर्षवर्धन यांच्यावर अपयशाचा ठपका– कोरोनाच्या दुसऱ्यालाटेत मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले व टीकेलाही तोंड द्यावे लागले त्याचे परिणाम आरोग्यमंत्र्यांना भोगावे लागले.

  रमेश पोखरियाल निशंक – मनुष्यबळ विकासमंत्री होते. कोरोनाबाधित होते. महिनाभर रुग्णालयात उपचारार्थ दाखल होते.

  थावरचंद गहलोत – कर्नाटकचे राज्यपाल नियुक्त. स्वत:च मंत्रिमंडळातून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

  संतोष गंगवार- कामगार आणि रोजगार मंत्र्यांचे पत्र व्हायरल झाले होते, ज्यात उत्तर प्रदेश सरकारवर टीका करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते.

  सदानंद गौडा – कोरोनाकाळात औषधांच्या संकटामुळे त्यांची खुर्ची गेली.

  बाबुल सुप्रियो – आसनसोल येथील खासदार पर्यावरण मंत्रालयात राज्यमंत्री होते. पक्षावरही नाराजी होती. विधानसभा निवडणुकीत 50 हजार मतांनी पराभव.

  रावसाहेब दानवे पाटील – महाराष्ट्रातील जालना येथील खासदार, ग्राहक प्ररणे, खाद्य आणि सार्वजनिक पुरवठा विभागात राज्यमंत्री. निष्क्रियता भोवली.

  देबोश्री चौधरी – बंगालमधील रायगंज येथील खासदार देबोश्री महिला व हबाल विकास राज्यमंत्री होत्या. आता त्यांना संघटनेत सामिल केले जाईल.

  संजय धोत्रे – अकोला येथील खासदार. शिक्षण व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री. कामकाजाच्या आधारे बाहेर.

  प्रताप सारंगी – पशुपालन, डेअरी व मत्स्यपालन विभागाचे राज्यमंत्री होते. कामकाजाच्या आधारावर बाहेर

  रतनलाल कटारिया – हरयाणातील खासदार जलशक्ती मंत्रालयात राज्यमंत्री होते. जात समीकरणामुळे बाहेर.

  अश्विनी चौबे – आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री चौबे बिहारमधील बक्सर येथील खासदार. आरोग्य मंत्रालयाच्या कामकाजावरून नेतृत्वाची नाराजी भोवली.

  10 मंत्र्यांची साठीपूर्ण

  रमेश पोखरियाल निशंक, (61 वर्ष) : उत्तराखंडचे 5वे मुख्यमंत्रिपद भुषविले होते. हरिद्वार येथील खासदार. मनुष्यबळ विकासमंत्रालय होते.
  थावरचंद गहलोत : मध्यप्रदेशातील शाजापुरचे खासदार. त्यानंतर राज्यसभेत प्रवेश. सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाचे मंत्री. कर्नाटकच्या राज्यपालपदी नेमणूक

  सदानंद गौडा, (68 वर्ष) : बंगळुरूतील उत्तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार. रेल्वे मंत्रालय, कायदा व न्याय मंत्रालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाचा प्रभारही संभाळला. रसायन व खतमंत्री होते.

  संतोष गंगवार, (72 वर्ष) : उत्तरप्रदेशातील बरेलीचे खासदार. कामगार आणि रोजगार मंत्रालयात राज्यमंत्री.

  संजय धोत्रे, (62 वर्ष) : महाराष्ट्रातील अकोला येथील खासदार. शिक्षण राज्यमंत्री, इलेक्ट्रॉनिकी व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री होते.

  परताप सारंगी, (66 वर्ष) : ओडिशातील बालासोर येथील खासदार. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयसह पशुपालन, डेअरी, मत्स्य पालन मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.

  रतनलाल कटारिया, (69 वर्ष) : हरयाणातील अंबाला येथील खासदार. जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.

  अश्विनीकुमार चौबे, (68 वर्ष) : बिहारमधील बक्सर येथील लोकसभा खासदार. आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री होते.

  रविशंकर प्रसाद, (61 वर्ष) : मोदी सरकारमध्ये कायदामंत्री होते.

  प्रकाश जावडेकर, (70 वर्ष) : माहिती व प्रसारण मंत्री होते.

  राजीनामा देणारे मंत्री

  1. सदानंद गौडा
  2. रविशंकर प्रसाद
  3. थावरचंद गहलोत
  4. रमेश पोखरियाल निशंक
  5. डॉ. हर्षवर्धन
  6. प्रकाश जावडेकर
  7. संतोषकुमार गंगवार
  8. बाबुल सुप्रियो
  9. संजय धोत्रे
  10. रत्तनलाल कटारिया
  11. प्रतापचंद सारंगी
  12. देबोश्री चौधरी