आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; सर्वपक्षीय बैठकीत मोदींची चर्चेची तयारी

बैठकीत विरोधी पक्षाने कृषी कायदे, इंधन दरवाढीचा मुद्दाही उचलून धरला तसेच एनईईटीमध्ये ओबीसींसाठी आरक्षण लागू करण्याची मागणीदेखील विरोधी पक्षांनी केली. दरम्यान, पाच अध्यादेशांसह अनेक विधेयके प्रस्तावि असून एकूण 29 विधेयके संसदेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. तथापि, इतकी विधेयके पारित करण्यावर वेळ खर्च केला तर सामान्यांच्या प्रश्नांवर केव्हा चर्चा होईल, असा सवालही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.

    दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीला संबोधित केले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीत 33 पक्षांच्या 40 पेक्षा अधिक नेत्यांनी भाग घेतल्याची माहिती दिली. सर्व नेत्यांचे आणि विरोधी पक्षांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. चांगली आणि फलदायी चर्चा संसदेत होणे अपेक्षित आहे.

    संसदेच्या नियमांनुसार आणि प्रक्रियेनुसार उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असे मोदी म्हणाल्याचे ते म्हणाले.बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल, काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, डीएमकेचे तिरुची रिवा उपस्थित होते.

    बैठकीत विरोधी पक्षाने कृषी कायदे, इंधन दरवाढीचा मुद्दाही उचलून धरला तसेच एनईईटीमध्ये ओबीसींसाठी आरक्षण लागू करण्याची मागणीदेखील विरोधी पक्षांनी केली. दरम्यान, पाच अध्यादेशांसह अनेक विधेयके प्रस्तावि असून एकूण 29 विधेयके संसदेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. तथापि, इतकी विधेयके पारित करण्यावर वेळ खर्च केला तर सामान्यांच्या प्रश्नांवर केव्हा चर्चा होईल, असा सवालही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. दरम्यान, हरसिमरत बादल यांनी सोमवारसाठी स्थगन प्रस्ताव सादर केला असून त्यास सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.