sambhaji raje

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी करण्यात आली. तसेच मराठी आरक्षणासाठी वटहुकूम काढावा अशीही मागणी राज्यसभेत छत्रपती संभाजीराजे आणि राजीव सातव यांनी राज्यसभेत केली. त्यावेळी मराठा आरक्षण प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद उमटल्याचे दिसून आले आहेत.

दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation)  चर्चा राज्यसभेत झाली आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव ( Rajiv Satav)  यांनी झिरो तासाच्या प्रश्नउत्तरात मराठा आरक्षणाबाबत नोटीस दिली. सातव यांनी नोटीसद्वारे मराठा समाजाच्या आरक्षणावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहेत. तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje)  यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी करण्यात आली. तसेच मराठी आरक्षणासाठी वटहुकूम काढावा अशीही मागणी राज्यसभेत छत्रपती संभाजीराजे आणि राजीव सातव यांनी राज्यसभेत केली. त्यावेळी मराठा आरक्षण प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद उमटल्याचे दिसून आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रकरणाला तात्पुरती स्थिगिती दिली आहे. त्यामुळे मराठी समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनता शून्य प्रहरात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी खासदार राजीव सातव आणि छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. नव्याने शिक्षण प्रवेश घेणारे आणि नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे मराठा समाज अधिक आक्रमक झाला आहे. कोल्हापूर येथे दि. २३ सप्टेंबरला राज्यस्तरीय गोलमेज परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत निर्णय घेण्यात येणार आहे.