R.S Ayurveda bil pass

विधेयकात तीन संस्था एका समाकलित केंद्रामध्ये विलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला गुजरातमधील जामनगर येथे आधारित आयुर्वेदातील शिक्षण व संशोधन संस्था असे म्हटले जाईल. राष्ट्रीय महत्व असलेल्या संस्थेचा दर्जा देण्यात येणारी ही पहिली आयुर्वेद संस्था असेल.

दिल्ली : राज्यसभेत (आर.एस.) बुधवारी आयुर्वेदातील (Ayurveda) शिक्षण आणि संशोधन शिक्षणसंस्थेच्या विधेयकास मंजूरी मिळाली आहे.  (Ayurveda Education and Research Institute Bill) हे विधेयक मंजूर झाल्यानंतर संस्थेला राष्ट्रीय महत्व देणारी संस्था म्हणून घोषित केले जाईल. आणि आयुर्वेदातील शिक्षण (Education), संशोधन आणि प्रशिक्षणात गुणवत्ता व उत्कृष्टतेसाठी प्रोत्साहन दिले जाईल.

विधेयकात तीन संस्था एका समाकलित केंद्रामध्ये विलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला गुजरातमधील जामनगर येथे आधारित आयुर्वेदातील शिक्षण व संशोधन संस्था असे म्हटले जाईल. राष्ट्रीय महत्व असलेल्या संस्थेचा दर्जा देण्यात येणारी ही पहिली आयुर्वेद संस्था असेल.

“संस्थेची निवड अत्यंत सावधगिरीने केली गेली आहे कारण १९५६ मध्ये सरकारने निर्माण केलेले हे सर्वात प्राचीन आयुर्वेद केंद्र आहे. या पदाची पात्रता असणारी ही प्रथम क्रमांकाची संस्था आहे,” असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन विधेयकावर चर्चा करताना राज्यसभेमध्ये म्हणाले.

आयुर्वेदातील पोस्ट ग्रॅज्युएट टीचिंग अँड रिसर्च इंस्टिट्यूट, श्री गुलाबकुंवरबा आयुर्वेद महाविद्यालय आणि भारतीय आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायन्सचे जामनगर आधारित प्रस्तावित संस्थेत विलीनीकरण केले जाईल. जामनगरमधील गुजरात आयुर्वेद विद्यापीठाच्या प्रांगणात प्रस्थापित संस्था असेल.

“गेल्या २० वर्षांत ६५ देशांमधून विद्यार्थी या संस्थेत शिकण्यासाठी आले आहेत. याला कित्येक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे, आणि आयुर्वेदाच्या वाढत्या लोकप्रियतेस मदत केली आहे. “नजीकच्या भविष्यकाळात या यादीमध्ये इतर संस्थांचा देखील समावेश असू शकेल,” असेही त्यांनी नमूद केले.

यापूर्वी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मंजूर झाले होते. आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) मंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या वतीने डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी हे विधेयक संसदेत मांडले.