सामान्य जनतेसह शेतकऱ्यांचं नुकसान होतेय, तर महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय ; राकेश टिकैत यांची मोदी सरकारवर कडाडून टीका

सामान्य जनतेचे नुकसान होतेय, शेतकरीही बर्बाद होतोय. सर्व गोष्टी महाग होत चालल्या आहेत. महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय. कंपनी सरकार सुरू असल्याची टीका राकेश टिकैत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 

    नवी दिल्ली: गॅसच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता अगदी त्रस्त झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच इंधनचे दर कमी होण्याची शक्यताही धूसरच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. भारतीय किसान युनियन आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली असून, महागाईवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे.

    आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, तरी यावर ठोस तोडगा निघालेला नाही. यानंतर आता राकेश टिकैत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.

    सामान्य जनतेसह शेतकऱ्यांचं नुकसान होतेय

    सामान्य जनतेचे नुकसान होतेय, शेतकरीही बर्बाद होतोय. सर्व गोष्टी महाग होत चालल्या आहेत. महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय. कंपनी सरकार सुरू असल्याची टीका राकेश टिकैत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.