देश ख्रिश्चनमय करण्यासाठी रामदेव बाबांना  ‘टार्गेट’ केल जातयं; आचार्य बालकृष्ण यांच्याकडून बाबा रामदेवांचा बचाव

पतंजली उद्योगाचे सहसंस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादात सापडत आहेत. आपले गुरू रामदेव आणि पतंजली उद्योगावरील होत असलेला लोकांचा हल्ला पाहून आचार्य बालकृष्णदेखील मैदानात उतरले आहेत.

    दिल्ली :  पतंजली उद्योगाचे सहसंस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादात सापडत आहेत. आपले गुरू रामदेव आणि पतंजली उद्योगावरील होत असलेला लोकांचा हल्ला पाहून आचार्य बालकृष्णदेखील मैदानात उतरले आहेत.

    बालकृष्ण यांनी म्हटले आहे की, रामदेव यांना टार्गेट करून योग आणि आयुर्वेद नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आचार्य बालकृष्ण यांनी आयएमएचे अध्यक्ष डॉ. जयालाल यांचे एक कथित वक्तव्य सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यात म्हणण्यात आले आहे, की जयालाल हे रुग्णालयांत आणि शाळांमध्ये ख्रिश्चनिटीचा प्रचार करतात.

    आचार्य बालकृष्ण यांनी लिहिले आहे, की संपूर्ण देश ख्रिश्चयानिटीत कन्व्हर्ट करण्याच्या षड्यंत्रांदर्गत, रामदेव यांना टार्गेट करून योग आणि आयुर्वेदाला बदनाम केले जात आहे. देशवासियांनो, आता तरी गाढ झोपेतून जागे व्हा, अन्यथा येणाऱ्या पिढ्या तुम्हाला क्षमा करणार नाहीत, असे बालकृष्ण यांनी म्हटले आहे.