रामदेव बाबांच्या ‘कोरोनील’ची जागतिक स्तरावर दखल, औषधाला WHO कडून प्रमाणपत्र

कोरोनील औषधावरून काही काळापूर्वी वादंग निर्माण झाले होते. मात्र, आता या औषधास ‘सर्टिफिकेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट-डब्ल्यूएचओ गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’चे प्रमाणपत्र मिळाले असल्याची माहिती स्वामी रामदेव यांनी दिली. त्याचप्रमाणे कोरोनीलच्या वैज्ञानिक शोधपत्राची माहितीदेखील सार्वजनिक करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली: योगगुरू रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाला हिरवा कंदील दाखवण्यात आला असून जागतिक स्तरावर त्याची दखल घेण्यात आली आहे. औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे काल (शुक्रवार) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे औषध पुन्हा एकदा बाजारात आणण्यात आले आहे.

    कोरोनील औषधावरून काही काळापूर्वी वादंग निर्माण झाले होते. मात्र, आता या औषधास ‘सर्टिफिकेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट-डब्ल्यूएचओ गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’चे प्रमाणपत्र मिळाले असल्याची माहिती स्वामी रामदेव यांनी दिली. त्याचप्रमाणे कोरोनीलच्या वैज्ञानिक शोधपत्राची माहितीदेखील सार्वजनिक करण्यात आली आहे.

    दरम्यान, आयुर्वेद संशोधनामध्ये सातत्य ठेवणे, हे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे चमत्कार दाखविल्याखेरीज कोणीही नमस्कार करत नसल्याचे सांगून त्यांनी ‘कोरोनील’चे कौतुक केले.